प्रतीक्षा संपली! राज्याचा दहावीचा निकाल २७ मे रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची (SSC Result) तारीख घोषीत केली आहे. सोमवारी (दि. २७) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये निकालाची छापील प्रत देण्यात येणार आहे. बोर्डाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं mahresult.nic.in या वेबसाईटसह जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
