कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » Uncategorized » क्राईम डायरी » पुण्यात पत्नीनं काढला पतीचा काटा

पुण्यात पत्नीनं काढला पतीचा काटा

पुण्यात पत्नीनं काढला पतीचा काटा

पुणे शहर पुन्हा एकदा खूनाच्या घटनेमुळे हादरले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना लोणी काळभोर येते घडली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रवींद्र काशिनाथ काळभोर हे वडाळे वस्ती, लोणी काळभोर येथे राहणारे शेतकरी असून, ते घराबाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणाची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अवघ्या तीन तासात आरोपी पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या तपासात उघड झाले की, शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध होते आणि रवींद्र काळभोर हे त्या संबंधात अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून रवींद्र यांचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री 11 च्या सुमारास झोपलेल्या रवींद्र यांच्यावर दगड आणि लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket