समाजसेवक रवींद्र कांबळेंच्या संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
सातारा : जिल्ह्यातील सर्व सामान्य गोरगरीब रूग्णांसाठी आता फलआहार देण्याचा स्तुत्य उपक्रम सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांच्या संजीवन बहुउद्देशीय संस्थेने सुरू केला. या स्तुत्य उपक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राहुलदेव खाडे , श्री. व्यंकटेश गौर, रवींद्र कांबळे, मिलींद कांबळे व संस्थेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते फलआहार वाटपाने संपन्न झाला. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा शासकिय रूग्णालयात रूग्णउपचारासाठी सोबत आलेल्या नातेवाईकांना दैनंदिन स्वरूपात सायंकाळी मोफत अन्नदान उपक्रम याआधीच संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था राबवित आहे. यासोबतच नव्याने फक्त रूग्णांकरीता त्यांच्या उपचारासाठी महत्वाचे असणार्या फल आहाराची सुविधे सोबतच व गरम पाणी वाटपाचा उपक्रम संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सुरू केला. याचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल रूग्णांना फलआहार हा गरजेचा असतो., गोरगरीब रूग्णांना उपचार सुरू असताना दर्जेदार फळे खाण्यासाठी मिळणे देखील दुरापास्थ अशी अवस्था पाहुन त्यांना फलहार मोफत देवून उपचारासाठी सहाय्य करण्याचे मोलाचे काम रवींद्र कांबळे यांनी संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केले असल्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच असल्याची भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केली.
समाजातील वंचित, दुर्लक्षीततर बेवारसांचे अंत्यसंस्कार, वृध्द निराधारांचे आधार, व मोफत अंत्यविधीचे साहित्य वाटप विविध स्वरूपातील आंदोलने करण्यासोबतच नव्याने आता जिल्हा रूग्णालयातील रूग्णांसाठी मोफत् फलआहार देण्याचा कौतुकास्पद उपक्रम रवींद्र कांबळे यांनी सुरू केला बद्दल सामाजसेवक अधिक्षक व्यकंटेश गौर यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.
