Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उगाच हवेत तीर मारण्यापेक्षा प्रभाकर घार्गेंनी माझ्याबरोबर समोरासमोर चर्चा करावी-मा.जयकुमार गोरे

उगाच हवेत तीर मारण्यापेक्षा प्रभाकर घार्गेंनी माझ्याबरोबर समोरासमोर चर्चा करावी-मा.जयकुमार गोरे 

उगाच हवेत तीर मारण्यापेक्षा प्रभाकर घार्गेंनी माझ्याबरोबर समोरासमोर चर्चा करावी-मा.जयकुमार गोरे 

सातारा : प्रतिनिधी मी गेली १५ वर्षे माण – खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि इथल्या जनतेची ईमानेइतबारे सेवा करत आहे. इथली मायबाप जनता नेहमीच मला आशीर्वाद देत आली आहे. मी कधीच दहशत आणि गुंडगीरी केली नाही. कारखान्यावर हजारो टन ऊसाची काटकामारी करुन राजरोसपणे शेतकऱ्यांचा गळा कापणाऱ्यांनी माझ्या दहशतीची भाषा करु नये. मी केलेल्या पाणीयोजनांच्या प्रत्येक कामांची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. उगाच हवेत तीर मारण्यापेक्षा प्रभाकर घार्गेंनी माझ्याबरोबर समोरासमोर चर्चा करावी असे खुले आव्हान आ. जयकुमार गोरे यांनी दिले.  

     खटाव तालुक्यातील विविध गावांच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मी माण – खटावच्या दुष्काळमुक्तीची लढाई उद्दिष्ट ठेवून चार टप्प्यात विभागली होती. आमदारकीच्या पहिल्या तीन कार्यकाळात उरमोडी, तारळी, जिहेकठापूरचे पाणी आणले. माणच्या उत्तर भागाला पाणी दिले. आता चौथा टप्पा माझे व्हिजन आहे. त्यात दोन्ही तालुक्यातील ५२ गावांसाठीच्या टेंभू योजनेला ७५० कोटींचा निधी आणि अडिच टीएमसी पाणी मिळवून कामे सुरु केली आहेत. माणमधील उर्वरित गावांचा जिहेकठापूर योजनेत समावेश करुन त्यासाठी सव्वा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. घार्गेंमुळे रखडलेल्या औंधसह वीस गावांची पाणीयोजना रज्यपालांकडे मान्यतेला पाठवली आहे. मी गेल्या १५ वर्षात पाणीयोजनांची केलेली कामे, मिवळवलेला हजारो कोटींचा निधी कागदावर आहे. शरद पवारांनी आमच्या पाणीयोजना रखडवण्याचेच काम केले. घार्गेंनी हवेत तीर मारण्यापेक्षा समोरासमोर येवून चर्चेचे आव्हान स्विकारावे. चार टप्प्यातील दुष्काळमुक्तीची लढाई यशस्वीपणे वेळेत पूर्ण करुन आता जगाशी स्पर्धा करण्यासाठी मतदारसंघात औद्योगिकरणाची बीजे रोवली आहेत. म्हसवड येथील एमआयडिसीचा प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत समावेश करुन महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत उभी रहात आहे. त्यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक क्रांती करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. दळवळणाची क्रांती तसेच जलक्रांती झाल्यावर आता औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती आम्ही हाती घेतली आहे.

बारामती, फलटणकरांनी पाणीयोजना रखडवल्या ….

माण – खटावच्या पाणीयोजना बारामतीच्या पवारांनी आणि फलटणच्या रामराजेंनीच रखडवल्या. शरद पवार पाणीच नाही तर द्यायचे कुठून असे म्हणायचे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागात पाणी येणार नाही असे रामराजे म्हणायचे. जयंत पाटलांनी जिहेकठापूरच्या वाढीव आंधळी योजनेचे टेंडर रखडवले होते. त्यामुळे घार्गेंनी नाकर्त्या नेत्यांची तळी उचलू नये. मी रात्रंदिवस परिश्रम करुन पाणी योजनांसाठी हजारो कोटींचा निधी मिळवून कामे पूर्णत्वाला नेली आहेत. मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्ती अंतिम टप्प्यात आणली आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान

Post Views: 91 महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान सातारा -(अली मुजावर) सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर आणि

Live Cricket