Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यात पी. आर. पी.च्या सकारात्मक आंदोलनाला जनतेचा वाढता पाठिंबा.

साताऱ्यात पी. आर. पी.च्या सकारात्मक आंदोलनाला जनतेचा वाढता पाठिंबा.

साताऱ्यात पी. आर. पी.च्या सकारात्मक आंदोलनाला जनतेचा वाढता पाठिंबा.

सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अनेक आंदोलन होतात. या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जनता पाठिंबा देते. त्याचाच भाग सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामान्यांच्या न्याय मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. वास्तविक पाहता पालकमंत्री साताऱ्यात असतानाही आंदोलनाची नकारात्मक रित्या दृष्टिकोन ठेवला असल्याचे सिद्ध झाले. अशी ही खंत सामाजिक कार्यकर्ते करत आहे. 

याबाबत आंदोलकांनी माहिती दिली की, सातारा तालुक्यातील वाढे येथील भूमापन क्रमांक गट क्रमांक ६३ मधील ३ हिस्सा क्षेत्रातील धोकादायक गॅस स्टेशन उभारण्यात येत आहे. हा सर्व परिसर पावसाळ्यात कोसळणाऱ्या पुराने व्यापलेला असतो. भविष्यात या ठिकाणी दुर्घटना घडू शकते. म्हणून हे गॅस स्टेशन स्थलांतरित करावे. अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी निवेदनाद्वारे केली होती. सध्या सातारा जिल्ह्यात सेवा पंधरा वडा सुरू असताना सुद्धा अनेक आंदोलनाकडे या कालावधीमध्ये दुर्लक्ष होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रशासन सेवा पंधरा नेमकं कुणासाठी करतात ? असा प्रश्न पडलेला आहे.

      सिलेक्टेड प्रश्न सोडवणे व सिलेक्टेड लोकांनाच जवळ करणे. अशी सिलेक्टेड बाब सातारा जिल्ह्यात घडत असल्याने सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी सुद्धा चिंताग्रस्त बनले आहेत. या शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिलेला आहे. वास्तविक पाहता एखाद्या गोष्टीसाठी परवानगी घेणे आवश्यक असताना काही नियम शिथिल करून काही विभागाच्या परवानग्या घेतल्या जातात. हीच फार मोठी गंभीर बाब आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास वित्त व होणाऱ्या जीवितहानीला संबंधित जबाबदार असून याबाबत परिपूर्ण माहिती सादर करूनही कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्न ठेव पंधरवडा झाल्याची चर्चा व टीका राजकीय विरोधक करू लागलेले आहेत .दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या धरणे आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, अँड प्रभाकर कांबळे, उमेश चव्हाण, दादासाहेब ओव्हाळ, विजय ओव्हाळ यांच्यासह विविध संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सध्या या धरणे आंदोलनात श्री रमेश अनिल उबाळे, महेश रणदिवे ,रियाज मुलानी ,यदु खंडाईत व बाळासाहेब चव्हाण सहभागी झालेले आहेत. या धरणे आंदोलनामुळे सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय कारभार चांगला उजेडात आला आहे.

रणे आंदोलन सुरू होताच शिरढोण तालुका कोरेगाव येथील शौचालय पाडलेल्या प्रकरणाबाबत सकारात्मक रित्या पत्रव्यवहार झाल्याने हा मुद्दा आंदोलनातून कमी करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket