Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दिव्यांगांची मानहानी करणाऱ्या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार आयटी ॲक्टन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

दिव्यांगांची मानहानी करणाऱ्या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार आयटी ॲक्टन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

दिव्यांगांची मानहानी करणाऱ्या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार; आयटी ॲक्टन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सातारा प्रतिनिधी :गोडोली येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे दिव्यांग व्यक्तींविरोधात अवमानकारक व हिणकस शब्दांचा वापर केल्याचा प्रकार समोर आला असून, या कृत्यामुळे दिव्यांगांची जाणीवपूर्वक मानहानी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. “लंगड्या” यासारख्या शब्दांचा वापर करून दिव्यांगांचे मनोबल खचवणे व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिव्यांग संघटनांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात आयटी ॲक्ट 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असून, पोलिस कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सायबर माध्यमांवरून होणाऱ्या अशा प्रकारच्या अपमानास्पद कृत्यांवर कडक कारवाई केली जावी, अशी ठाम मागणी दिव्यांग संघटनांनी केली आहे.

याशिवाय जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी तसेच राज्य व राष्ट्रीय दिव्यांग हक्क आयुक्तालयाकडेही सदर प्रकरणाची लेखी तक्रार सादर करण्यात येणार असून, दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ही एक अत्यंत गंभीर बाब असून, दिव्यांगांची मानहानी करणे किंवा त्यांचा अपमान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ (RPWD Act, 2016) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाईची तरतूद आहे. 

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ (कलम ९२): जर कोणी सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तीचा हेतुपुरस्सर अपमान केला किंवा तिला धमकावले, तर त्याला ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

आयटी ॲक्ट (IT Act): जर ही मानहानी सोशल मीडिया (फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम इ.) किंवा इंटरनेटद्वारे केली गेली असेल, तर आयटी ॲक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला जातो.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket