तीर्थक्षेत्र कासवंड येते माऊलींचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात संपन्न
भिलार -कासवंड गावामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात पार पडला.संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा 750 वा जन्मशताब्दी सोहळा व गावातून माऊलींची भव्य अशी मिरवणूक तिरंगा रॅली वृक्षारोपण नामस्मरण असे विविध कार्यक्रम कासवंड गावचे विद्यमान सरपंच कीर्तनकार हरिभक्त पारायण जनार्दन महाराज चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. गावचा कीर्तनकार सरपंच असेल व गाव वारकरी संप्रदायात असेल तर नक्कीच गावामध्ये सदैव भक्तीचा वास दरवळत राहील यात शंकाच नाही.
चैतन्य कचरनाथ स्वामी पायीवारी नामदिंडी सोहळ्याचे दिंडी प्रमुख ह.भ.प. गुरुवर्य श्री.दत्तात्रय महाराज गाढवे (आण्णा )यांनी गावात असंख्य कीर्तनकार घडवले त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण गाव वारकरी झाले.या वारकरी गावात माऊलींचा सोहळा अतिशय उत्साहाने पार पाडला. शंभर वर्षांचा टप्पा हा केवळ कालगणनेतील एक आकडा नसतो, तर तो एखाद्या महान कार्याचा, परंपरेचा आणि प्रेरणेचा सुवर्णक्षण असतो. म्हणूनच माऊलींचा शताब्दी सोहळा हा एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पर्व ठरतो.
संत माऊलींच्या विचारांचा प्रसार, त्यांच्या अभंगांचा गजर आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण या सोहळ्यातून होते. कासवंड, चोरमलेवाडी गावात भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी सोहळे, रथयात्रा यांचे आयोजन होऊन भक्तिमय वातावरण निर्माण होते. शेकडो हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन संतांच्या चरित्राचा अनुभव घेतात.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त भक्तिपर नाही, तर समाजोपयोगीही असतो. सोहळ्यानिमित्त अन्नछत्र,वृक्षारोपण, शैक्षणिक मदत,यांसारखे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे अध्यात्म आणि सेवा या दोनही वाटा एकत्र येऊन खऱ्या अर्थाने “भक्ती आणि शक्तीचा संगम घडतो.
शताब्दी सोहळा आपल्याला केवळ गतकाळाची आठवण करून देत नाही, तर नवे ध्येय आणि दिशा दाखवतो. माऊलींच्या शिकवणीतून सद्भावना, समाजातील ऐक्य, निस्वार्थ सेवा, प्रेम आणि अध्यात्मिक उन्नती या मूल्यांना चालना मिळते.म्हणूनच माऊलींचा शताब्दी सोहळा हा फक्त उत्सव नाही, तर तो एक संस्कार पर्व आहे. या पर्वातून आपल्याला भूतकाळाचे स्मरण, वर्तमानाचे बळ आणि भविष्याचा मार्गदर्शन लाभते. खऱ्या अर्थाने हा सोहळा म्हणजे संतविचारांचा उत्सव आणि मानवतेचा महापर्व होय.
या सोहळ्यात 15 ऑगस्ट निमित्त तिरंगा रॅली काढून गावात वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्यास उपसरपंच रमेश पवार अखिल वारकरी संघ महाबळेश्वर तालुका अध्यक्ष श्रीरंग पवार सचिन महाराज चोरमले आनंदा पवार साहेबराव पवार नितीन चोरमले चंद्रकांत महाराज पवार तुकाराम महाराज पवार माजी पोलीस पाटील दत्तात्रेय रखमाजी पवार विठ्ठल भाऊजी पवार माजी सरपंच गणेश पवार संदीप पवार,सुनील पवार, एकनाथ गोळे, बिपिन पवार, शिवाजी पवार,गुरुजी कांबळे,गुरुजी रविकांत सपकाळ ग्रामसेवक संजय पवार,सुरेंद्र पवार, विष्णू पवार बाजीराव उंबरकर, भिकू पवार अंकुश पवार बहिरू पवार,पांडुरंग पवार,गणेश महाराज ढेबे महिला बचत गट कासवण, च्या सर्व पदाधिकारी व महिला भगिनी जिल्हा परिषद शाळा कासवंडचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मंडळ कासवंड चोरमलेवाडी गोळेवाडी हिरवेवाडी धामूनसेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
