Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मध्ये शासकीय तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मध्ये शासकीय तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मध्ये शासकीय तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू.

सातारा :- ‘पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा’ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास परीक्षा मंडळ, मुंबई च्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे. यामध्ये १) इलेकट्रीकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट. २) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन टु व्हीलर व फोर व्हीलर मेकॅनिक. ३) इलेकट्रीकल वायरमन ४) मोटर आर्मेचर वाईडिंग ५) कॉम्प्यूटर ऑपरेटर वुईथ एम. एस. ऑफिस ६) कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ७) एअर कंडीशन रेफ्रिजरेशन मेकॅनिक ८) प्लंबर. तसेच १) डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक. २) डिप्लोमा इन इलेकट्रीकल इत्यादी तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू झाले असून सदर कार्सेसना पात्रता ८ वी /१० वी /१२ वी पास/नापास आहेत तसेच कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व विविध कंपन्या, कार्यालयामधील कामगार/कर्मचारी यांनाही प्रवेश घेता येतो. सर्व कोर्ससचे माध्यम मराठी /इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी भरपूर प्रॅक्टीकल घेतली जातात.

वरील विविध तांत्रिक कोर्सेसच्या शासकीय परीक्षा होतात. सर्व कोर्सेसच्या सर्टिफिकेटची व मार्कलिस्टची एम्प्लायसमेंटला नोंद होते. व्यवसायासाठी कर्ज मिळते. प्रशिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १००% नोकरी विविध कंपन्या मध्ये दिली जाते. इलेकट्रीक्ल कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना पी.डब्ल्यू. डी. वायरमन लायसन्स परिक्षेसाठी व एसआयएस रजिस्ट्रेशनसाठी मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक औद्योगिक सहलीचे आयोजन केले जाते. जिल्हयातील व जिल्हा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय आहे.

तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण पुर्ण केलेले प्रशिक्षणार्थी अल्प भांडवलामध्ये स्वतःचा १) इलेक्ट्रीकल कोर्स पुर्ण केल्यानंतर इलेक्ट्रीकल वायरिंग, मोटार दुरूस्ती, फॅन, मिक्सर इ. उपकरणाची विक्री व दुरूस्तीचा व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच एम.एस.ई.बी., सहकारी साखर कारखाने व विविध कंपन्यामध्ये नोकरी मिळू शकते.

२) ऑटोमोबाईल मॅकेनिक टेक्निशियन कोर्स पुर्ण केल्यानंतर विविध प्रकारच्या टु व्हीलर दुरूस्तीचा व्यवसाय अथवा स्पेअर पार्टसचे दुकान किंवा स्वतःचे गॅरेज सुरू करता येते. तसेच विविध कंपन्या व एजन्सी मध्ये नोकरी मिळू शकते त्याचप्रमाणे फोर व्हीलरचा कोर्स पुर्ण केल्यानंतर फोर व्हीलरचे गॅरेज अथवा सर्व्हिसिंग सेंटर सुरू करता येते किंवा विविध कंपन्या/एजन्सी मध्ये नोकरी मिळू शकते.

३) प्लंबर कोर्स पुर्ण केल्यानंतर घरगुती व बांधकाम विभागातील विविध कामे करता येतात.

४) एअर कंडिशन रेफ्रिजरेशन कोर्स पुर्ण केल्यानंतर स्वतःचे फ्रिज, ए.सी., विंडो, कॉम्प्रेसर, वॉशिग मशिन दुरूस्तीचा व्यवसाय सुरू करता येतो तसेच खाजगी व शासकीय दुध डेअरी मध्ये नोकरी मिळू शकते.

५) कॉम्प्युटर ऑपरेटर एम. एस. ऑफिस व हार्डवेअर कोर्स पुर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर टेक्निीशियन किंवा कॉम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय सुरू करता येतो. या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या कंपन्या, बँका, हायस्कूल, कॉलेज इ. क्षेत्रातील कॉम्प्युटरची देखभाल व दुरूस्तीची कामे करू शकतात.

प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जिद्द व प्रयत्नावर व्यवसाय करून स्वावलंबी झालेले आहेत व होत आहेत. तसेच संस्थे मार्फत विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंट दिली जाते.प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा मूळ दाखला/ डुप्लीकेट दाखला/१० वी / १२ वी चे मार्कलिस्ट/सर्टिफिकेट, सात फोटो, आधार कार्ड झेरॉक्स इ. कागदपत्राची पुर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत.माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किमत रूपये १००/- असून मनीऑर्डरने रू. १२५/- पाठवा.

तेव्हा विद्यार्थी, पालकांनी अधिक माहितीसाठी संचालक सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिकस इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, नवीन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१, ऑफिस वेळ सकाळी १० ते ५.३० वेळेत संपर्क साधावा.

Email – patilinstitutesatara@gmail.com

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 61 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket