पार्थ पवार यांच्या कंपनीवर सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप
पुणे -पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी आणि अतिउच्चभ्रू असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात असणारी तब्बल 40 एकर सरकारी जमीन सगळे सरकारी नियम धाब्यावर बसवून खरेदी करण्यात आली असल्याने पार्थ पवार आणि पर्यायी अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पार्थ पवार यांच्या कंपनीने कमी किंमतीत सरकारी जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या संबंधित एका कंपनीने सरकारी मालकीची जमीन बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत व्यवहारातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या व्यवहारात शासन नियमांचे पालन झाले का, जमीन मूल्यांकन प्रक्रिया योग्य होती का, आणि व्यवहारास मंजुरी देताना कोणते निकष वापरण्यात आले याबाबत अधिकृत तपासणीची मागणी केली जात आहे. दरम्यान, संबंधित कंपनीकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही.
जमीन व्यवहाराबाबतचे दस्तऐवज समोर आल्यावर या प्रकरणाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. पुढील काही दिवसांत शासन किंवा संबंधित यंत्रणांकडून तपासाची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




