पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीत, बाबासाहेबांना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यानंतर मोदी दीक्षाभूमीमध्ये गेले. दीक्षाभूमीमध्ये मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन केले. भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले.
मोदींनी दीक्षाभूमी येथे १५ मिनिटांचा कालावधी घालविला. यावेळी भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्यासह भंते उपस्थित होते. मोदी यांनी काही मिनिटे दीक्षाभूमी येथे ध्यानसाधना केली असल्याची माहिती आहे. मोदींनी दीक्षाभूमी भेटीबाबत एक संदेशही लिहिला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. पंतप्रधान म्हणून मोदींची ही दीक्षाभूमीला दुसरी भेट आहे. पंतप्रधान यांचे स्वागत करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी १४ एप्रिल २०१७ रोजी दीक्षाभूमीला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२६ वी जयंती होती.
