पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन स्थापनेची मागणी — सामाजिक न्याय संस्थेकडून मुख्यमंत्री व मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन
पाचगणी (प्रवीण घाडगे )वाई, महाबळेश्वर, खंडाळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. मकरंद आबा पाटील यांना पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सम्राट अशोक नगर, फायनल प्लॉट क्रमांक ४८७ (अ) या ठिकाणी तालुका स्तरावर संविधान भवन उभारावे अशी मागणी करणारे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संस्था यांच्या वतीने देण्यात आले.
या ठिकाणी अनेक वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विजय शंकर वन्ने यांच्या कब्जा व वहीवाटीत असलेले सांस्कृतिक भवन आहे. समाजातील सर्व घटकांकडून या जागेवर संविधान भवन उभारण्याची सातत्याने मागणी होत आहे.
दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष विजय वन्ने यांनी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे लेखी निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आमदार मकरंद आबा पाटील यांना सादर केले.यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रवीणशेठ भिलारे, माजी नगरसेवक प्रकाशशेठ गोळे, नामदेव चोपटे, यशवंत पार्टे, सुनील पार्टे, बौद्धाचार्य श्री अरुण घाडगे व सामाजिक न्याय संस्थेचे कार्यकर्ते, स्थानिक समाज नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांना संविधानाच्या मूल्यांशी जोडणारे हे भवन उभारले जावे, ही सर्वसामान्यांची मागणी आहे.
