कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » प्रशासकीय » पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वीकारला पदभार; पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी सज्ज

पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वीकारला पदभार; पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी सज्ज

पाचगणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वीकारला पदभार

पाचगणी प्रतिनिधी –पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी दिलीप भाऊ बगाडे यांनी आज विधिवतपणे पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती होती.

नगरपालिका सभागृहात पार पडलेल्या पदभार स्वीकार समारंभाला स्थानिक पदाधिकारी, पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख व सर्वसमावेशक कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

“पाचगणी शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पर्यटन विकास तसेच मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,” असे बगाडे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही शहराच्या विकासासाठी सकारात्मक व सहकार्याची भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. पदभार स्वीकार समारंभानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामने, आकाश बगाडे, विमल भिलारे, अमित कांबळे, राजश्री सणस, परवीन मेमन, महेश खांडके, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, स्वाती कांबळे, अमृता गोळे, माधुरी कासुर्डे आणि सुप्रिया माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket