पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग ९-ब मधून श्री.जॉन गॅब्रियल जोसेफ यांचा विजयाचा निर्धार
मूलभूत सुविधा, रोजगार, पाणीपुरवठा आणि सामाजिक न्याय हा प्रमुख विकास अजेंडा
पाचगणी : पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 ला रंगत येत असताना प्रभाग क्रमांक ९-ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्री. जॉन जोसेफ यांनी मतदारांसमोर सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप सादर केला आहे. सामाजिक प्रश्नांवर सतत आंदोलने, नागरिकांच्या हक्कांसाठी लढा आणि विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांच्या कार्यामुळे ते चर्चेत आहेत.
विकासाचे महत्त्वाचे मुद्दे
1. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा.
2. पाचगणीतील शाळा आणि हॉटेल उद्योगात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
3. वार्डातील युवकांसाठी प्रशस्त व्यायामशाळा (जिम) उभारण्याची संकल्पना.
4. महिलांसाठी शासकीय व निमशासकीय योजनांमधून मदत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम.
5. 1967 च्या भूकंपग्रस्त व बेघर नागरिकांना घरकुलासाठी आरक्षित जागा मिळवून देण्यासाठी अथक पाठपुरावा.
6. पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून विहिरी व बोअरवेलच्या माध्यमातून पाणीटंचाई निवारण.
7. गटारे व ड्रेनेज लाईन विभक्त करून बंदिस्त गटारांची व्यवस्था.
8. जिल्हा व राज्य शासनाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील भूमिका.
‘काम करत आलोय… काम करत राहणार’ — जोसेफ यांचा संदेश
समाजातील अन्याय-अत्याचाराविरोधात रोज पोटतिडकीने आंदोलने करून लोकांचे प्रश्न शासनापर्यंत नेण्याचे काम जोसेफ सातत्याने करत आहेत.मीनल बेन मेहता कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण शिबिराचे आयोजन,पाचगणी–महाबळेश्वर मुख्य मार्ग पक्का करण्यासाठी PWD कार्यालयावर मोर्चा,शासनाच्या विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदतीचा हात,अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांचे कार्य ठळकपणे समोर येत आहे.




