Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

पांचगणी -पांचगणी नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पांचगणी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५ निमित्ताने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचगणीतील नागरिक, नगरपरिषद अधिकारी, शालेय प्रतिनिधी, विद्यार्थी, स्पर्धक मंडळे व विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिलदारी प्रकल्प व्यवस्थापक डॉ. मुकेश कुलकर्णी, पंचगणी पत्रकार संघाचे श्री. रविकांत बेलोषे, श्री. सचिन टक्के, श्री. दिलीप पाडळे, नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग प्रमुख सौ. स्वाती पाटील, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक श्री. गणेश कासुर्डे, शहर समन्वयक श्री. ओंकार धोले आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणपूरक व जबाबदार पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी पांचगणी नगरपरिषद व हिलदारीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सहभागींचे मूल्यांकन पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर साहित्याचा वापर, वृक्षारोपण, सामाजिक संदेश देणे आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे या निकषांवर करण्यात आले. पारंपरिक श्रद्धा आणि आनंद कायम ठेवून पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देण्याचा संदेश या स्पर्धेद्वारे अधोरेखित झाला.

घरगुती गणेशोत्सव स्पर्धा विजेते

🥇 प्रथम – नितीन प्रभाळे (₹5,000/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र)

🥈 द्वितीय – ऋषी होळकर (₹3,000/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र)

🥉 तृतीय – मनोज भोसले (₹1,000/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र)

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा विजेते

🥇 प्रथम – शाहू नगर क्रीडा मंडळ (₹10,000/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र)

🥈 द्वितीय – बिलिमोरिया हायस्कूल (₹7,000/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र)

🥉 तृतीय – महाराणा प्रताप मित्र मंडळ (₹5,000/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र)

सर्व सहभागी मंडळांना सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील यांनी घरगुती व सार्वजनिक मंडळांनी दाखवलेल्या सर्जनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच पुढील काळात प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा संकल्प नागरिकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सदर कार्यक्रमा दरम्यान हर घर तिरंगा व स्वच्छता ही सेवा ह्या उपक्रमात भाग घेतलेल्या विस्डम हायस्कूल, ज्ञानगंगा अकॅडेमी, संजीवन हायस्कूल, महात्मा फुले विद्या मंदिर व न.पा.शाळा क्र. २ या शाळांना व त्यांच्या विद्यार्थ्यांनाही विशेष गौरविण्यात आले.

या उपक्रमाद्वारे पंचगणी नगरपरिषद व हिलदारीने उत्सव हा केवळ आनंद व श्रद्धेपुरता न राहता, तर पर्यावरण संरक्षणाचे भान देणारा व शाश्वततेकडे वाटचाल करणारा ठरू शकतो हे अधोरेखित केले. भविष्यातही पंचगणीत स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि जबाबदार नागरिकत्व यांची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेतर्फे सांगण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket