पाचगणीत सुनील बगाडेंची तुफान लाट – नगराध्यक्षपदावर दावा भक्कम! वाढता जनसमर्थनाचा महापूर
पाचगणी प्रतिनिधी – पाचगणी नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार सुनील बगाडे यांना जनसमर्थनाचा प्रचंड ओघ मिळत असून शहरातील प्रत्येक घटकातून त्यांना ठोस पाठिंबा मिळताना दिसत आहे. सर्वसामान्य जनतेचा युवा नायक, उच्चशिक्षित आणि विकासाची स्पष्ट दृष्टी घेऊन पुढे येणारा आश्वासक नेतृत्वाचा चेहरा म्हणून पाचगणीकर नागरिक त्यांच्याकडे पाहत आहेत. ज्येष्ठांपासून युवा वर्गापर्यंत सर्वांना त्यांच्या उमेदवारीने उत्साह मिळाला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सुनील बगाडे यांचे नाव ठळकपणे आघाडीवर आहे. बगाडे कुटुंबाची निस्वार्थ समाजसेवेची परंपरा, शहरातील विश्वासार्ह प्रतिमा आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टीकोन यामुळे ते पाचगणीतील लोकप्रिय उमेदवार म्हणून उदयास येत आहेत. “वारसा कर्तृत्वाचा, संकल्प विकासाचा!” या घोषवाक्यासह त्यांनी भविष्यदर्शी रोडमॅप सादर केला आहे.
मूलभूत सुविधा आणि पाणी व्यवस्थापनावर प्राधान्य
सिद्धार्थनगर व परिसरातील दीर्घकालीन पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक नागरिकाला दरवर्षी 10 हजार लिटर पाण्याची हमी मिळावी यासाठी त्यांचा ॲक्शन प्लॅन तयार असून, पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
गावठाण आणि घरकुल प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन
सिद्धार्थनगर, शाहूनगर आणि संपूर्ण पाचगणीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित गावठाण प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी बगाडे बांधील आहेत. घरकुल योजनेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणून गरजू नागरिकांना न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छता, आरोग्य आणि गटारव्यवस्थेचे आधुनिकीकरण
शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करून संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था बंदिस्त व सुसज्ज करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. पाचगणीला मॉडर्न आणि स्वच्छ शहराचा दर्जा मिळवून देण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा ठरणार आहे.
पर्यटन, पार्किंग आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक
पार्किंग समस्येवर उपाय म्हणून अत्याधुनिक ‘पार्किंग पार्क’ विकसित करणार.
शहरात काँक्रीट रस्ते, सौंदर्यीकरण आणि नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक ‘वॉकिंग प्लाझा’ तयार करण्याची योजना.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, तर सर्वसामान्यांसाठी नवीन बगीचा उभारण्याची घोषणा.
ही सर्व कामे पर्यटन वाढवून शहराचे उत्पन्न आणि मान वाढवण्यास हातभार लावणार आहेत.
युवकांसाठी आधुनिक स्विमिंग पूल आणि क्रीडा सुविधा
युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक स्विमिंग पूल, एडव्हेंचर स्पोर्ट्स आणि पर्यटनवृद्धीसाठी नवीन उपक्रम राबवण्याचे आश्वासन बगाडेंनी दिले आहे.
शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता उंचावण्याचा निर्धार
पालिका शाळांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तज्ञ शिक्षकांची नेमणूक, आधुनिक शैक्षणिक साधने व दर्जेदार वातावरण उपलब्ध करून शिक्षणाचा मानांक वाढवण्याचे ठोस धोरण त्यांनी जाहीर केले.
व्यवसायवृद्धी आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी
स्थानिक कलाकुसर, हस्तकला व व्यावसायिक कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध करून शहरातील तरुणांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
उत्स्फूर्त पाठिंब्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणले
नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल होताच नागरिकांच्या मोठ्या गर्दीने व उत्साहाने वातावरण गजबजून गेले. या वेळी प्रकाश मोरे गुरुजी, संपत अण्णा खरात, प्रकाश खरात, राजूभाव बगाडे, रमेश बगाडे, गंगाभाव बगाडे, गौतम नाना कांबळे, नितीन सपकाळ, अरुण घाडगे, दिलीप ठेके, कमलाकर खरात, अशोक कदम, निलेश सपकाळ, राजेश कांबळे, अशोक गंगाराम कांबळे, राजू मोरे, महेश मोरे, सचिन तांबे, राजेश बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.




