पाल गटात भाजपचा जलवा आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
कराड -राजकीय दृष्ट्या कराड उत्तरचा महत्त्वाचा असणारा पाल जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सुरेश तात्या पाटील मदन काळभोर शंकर काका शेजवळ प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार मनोज दादा घोरपडे म्हणाले भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत आहे. सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यास काम करणार आहे. इंदोली पाल उपसा सिंचन योजना मार्गस्थ झाल्यामुळे या विभागातील लोकांचा माझ्या कामावरती व पक्षावरती विश्वास वाढलेला आहे. जास्त प्रमाणात कार्यकर्ते भाजपा प्रवेश करत आहेत. पाल जिल्हा परिषद गटासह संपूर्ण कराड उत्तर मध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. आपण सर्वांनी एक दिलाने कामास लागावे.
यावेळी पालगावचे सतीश शिंदे चेअरमन यशवंतराव चव्हाण पाणीपुरवठा संस्था, नरेंद्र साळुंखे चोरे विभागाचे नेते, जनार्दन साळुंखे माजी सरपंच चोरे, प्रवीण साळुंखे प्रशांत जाधव संतोष कुलकर्णी राजेंद्र साळुंखे सचिन वाघमारे दीपक साळुंखे संदीप कवळे संजय पाटील तंटामुक्ती अध्यक्ष हरपळवाडी, तानाजी पाटील माजी सरपंच हरपळवाडी, मच्छिंद्र संकपाळ चेअरमन, युवराज पाटील, शंकरराव चंदुगडे चेअरमन धावरवाडी, सुभाष गोरे, जयसिंग चंदुगडे सुरेश चंदुगडे संजय कदम कृष्णत कणसे रघुनाथ ढगाले लक्ष्मण कदम महादेव काटे शंकर चंदुगडे जगन्नाथ चव्हाण जगन्नाथ कदम संपतराव पाटील माजी सरपंच मरळी, नानासो शेळके उपसरपंच धावरवाडी राहुल कदम विजय डगाले संभाजी शेळके शिवाजी चंदुगडे संजय साळुंखे माजी सरपंच चोरे इत्यादी मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील नाना काळभोर संतोष पाटील गणेश इंजेकर महेश चंदुगडे शिवराज पाटील शरद भोसले अगन साळुंखे जितेंद्र साळुंखे मुकुंद गोळे अशोक यादव हनुमंत माने शुभम भिलारे शंकर मसुगडे मोहनराव सावंत आकाश तळेकर सागर कोळभोर, श्रीकांत चव्हाण दिलीप काळभोर दत्तात्रय शेलार रतनकाळभर ओंकार पवार कृष्णत चंदुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.



