हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे.  विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा नगरपरिषदेत भाजपाची निर्विवाद सत्ता अमोल मोहितेंचा पदभार सोहळा उत्साहात संपन्न वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » चित्रकला ही जागतिक भाषा आहे : प्राचार्य डॉ.सुनील कुमार लवटे

चित्रकला ही जागतिक भाषा आहे : प्राचार्य डॉ.सुनील कुमार लवटे

चित्रकला ही जागतिक भाषा आहे : प्राचार्य डॉ.सुनील कुमार लवटे

सातारा दि.26 ( प्रतिनिधी)चित्रांमधून भाव कळतो त्यामुळे चित्रकला ही जागतिक तसेच मानवीय भाषा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा आणि जी.इ.एस कला महाविद्यालय सातारा पाठखळ माथा अंतर्गत सहज शक्य शुक्रवार उपक्रमाद्वारे आयोजित केलेल्या कलाप्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात केले.

सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस, प्राचार्य विजयकुमार धुमाळ, संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला प्राचार्य डॉ. सुनील कुमार लवटे यांनी चित्र प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाले असे जाहीर केले. व ते यापुढे ते म्हणाले 

ज्या विद्यार्थ्यांकडे गाण्याची, चित्रकलेची, शिल्पकलेची तसेच इतर कोणत्याही प्रकारची कला असेल त्या विद्यार्थ्यांचा मी प्रचंड आदर करतो .कला व्यक्तीला इतर सामान्य माणसापेक्षा वेगळे महत्व देते. त्यामुळे मी चित्रकलेचा खूप अभ्यास केला जगातील सर्व चित्रकारांच्या आर्ट गॅलरी पाहिल्या असून त्यातून बरंच काही शिकलो.  यावेळी कलेची जागतिक राजधानी ही इटली असून फ्रान्स ही कलेची उपराजधानी आहे असे त्यांनी सांगितले. इटलीमध्ये रोम, व्हेनिस तर फ्रान्समध्ये पॅरिस हे शहर कलांच्या दालनासाठी खूप महत्वाची आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच शिकण्याबरोबर पैसे कमवण्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वावलंबी होऊन तुमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा, धार तसेच प्राण येतो. तसेच आपले जीवन आपल्या इच्छेप्रमाणे जगता येते.

     जगामध्ये अनेक भाषा असून प्रत्येक देशाची वेगळी अशी भाषा आहे. त्या भाषेला प्रादेशिक भाषा म्हंटले जाते यामध्ये फ्रान्स ची फ्रेंच ,स्पेनची स्पॅनिश ,डेन्मार्क ची डच ,इंग्लंडची इंग्रजी ,तेथील व्यक्ती त्या भाषेचा पुरस्कार करतात. यावेळी तुम्ही ज्या भाषेमध्ये काम करत आहात ती चित्र भाषा जागतिक तसेच मानवी भाषा असून त्या भाषेला कोणतीही सीमारेषा नाही.

     यावेळी त्यांनी स्वतः बद्दल माहिती देताना म्हणाले की मी नववी मध्ये चित्रकला या विषयात नापास झालो होतो अशा व्यक्तीला आपण या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यास बोलवले त्याबद्दल संस्थेचे संस्थापक -चेअरमन यांचे धन्यवाद मानतो.

    शिरीष चिटणीस म्हणाले गौरीशंकर कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ सर यांच्यामुळे कॉलेजचे नावलौकिक सातार मध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर पसरलेले आहे. त्याचे कारण असे आहे की साने गुरुजी मधील काही गुण धुमाळ मध्ये आहेत. ज्याप्रमाणे सनेगुरुजींनी विद्यार्थी घडवले त्यांच्यासाठी योजना आखल्या त्याचप्रमाणे धुमाळ सर विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहेत.

     तसेच प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत.

विशेषत: हिंदी विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. असंख्य मराठी पुस्तके त्यांनी हिंदीमध्ये लिहिली आहेत.

      हिंदी ही राष्ट्रभाषा होने मध्ये दक्षिणेकडील राज्य अडसर आहेत परंतु आज सर्व क्षेत्रात कंपनी, बँका ,कॉर्पोरेट सेक्टर,विविध संस्था यामध्ये हिंदी प्रामुख्याने बोलली जाते.

यावेळी विद्यार्थ्यांनो तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे या क्षेत्राला वृद्धिगंध करण्यासाठी तुम्ही ज्या देशांमध्ये कोठेही कामास जेव्हा जाल तेव्हा मराठी भाषे बरोबर हिंदी भाषेकडे ही लक्ष दिले गेले पाहिजे.

    तसेच या कार्यक्रमाला साने गुरुजींचा विचारांचा वारसा जपणारे , साहित्यिक , स्वकेंद्रित व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ. सुनील कुमार लवटे यांना या कार्यक्रमांमध्ये बोलवणे मागे त्यांचे विचार ऐकणे तसेच त्यांच्या शुभ हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन करणे हा हेतू होता.

     समाजामध्ये आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात क्रयशक्ती वाढली असूनही ही मंडळी चित्र खरेदी करत नाही. यासाठी त्या व्यक्तींना जेव्हा चित्रकलेमध्ये आवड निर्माण होईल, चित्रामधील भाषेचे ज्ञान होईल, चित्राचा विषय कोणता आहे, त्या चित्रांमध्ये कोणते साहित्य आहे. हे जेव्हा त्या व्यक्तीस कळेल तेव्हा तो व्यक्ती चित्र खरेदी करेल . या करिता मुंबई पुणे येथे नियमित चित्र प्रदर्शन भरवले जात असून चित्र विक्री केले जाते. त्यासाठी समाजामध्ये चित्र साक्षरता आणणे गरजेचे आहे.यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तम चित्र काढून आपले काढलेले चित्र हे जास्तीत जास्त किमतीला कसे विकले जाईल याकडे लक्ष द्यावे. तसेच आपले जीवन आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवावे असा मार्मिक सल्ला दिला.

    सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते गौरीशंकर कॉलेज पाटकळ माथा साताराचे प्राचार्य विजयराव धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले असून गायत्री गायकवाड हिने सूत्रसंचालन केले व प्रसाद चव्हाण यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. 

Post Views: 22 हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे.  सलमान खान

Live Cricket