पैलवान रवीभाऊ कुडाळकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
उंब्रज प्रतिनिधी :टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा उंब्रज गावचे शहराध्यक्ष पैलवान रवीभाऊ कुडाळकर यांचा वाढदिवस शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तू व ब्लॅंकेट वाटप करून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी आपल्या यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ खराडे संचालित आदर्श विद्यामंदिर हणबरवाडी ता. कराड जि. सातारा येथे टायगर ग्रुप उंब्रज शहराध्यक्ष पैलवान रवी भाऊ कुडाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक विक्रमसिंह काळभोर (सर) यांनी केले व सूत्रसंचालन अर्जुन देसाई (नाना) यांनी केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पै. रविभाऊ कुडाळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
समाजासाठी व प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी टायगर ग्रुप हा दिवसातील 24 तास आपल्या सेवेत कधीही हजर राहील अशी त्यांनी ग्वाही पै. रविभाऊ यांनी दिली.तसेच टायर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांचे तत्व त्यांनी पाळत गोरगरीब जनतेला व कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचे काम आपण सातत्याने करत आलो आहे व इथून पुढेही आपण करत राहील असे पैलवान रविभाऊ कुडाळकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आपल्या समाजामध्ये काही दिवसापासून मुलींचे अनुचित प्रकार घडत असतात त्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत जर कुठे असे प्रकार आढळतील तेथे टायगर ग्रुप हा पहिला मदतीचा हात देईल असे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना समक्ष सांगून संबोधित केले.
टायगर ग्रुप हा एक मदतीचा व कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या या संस्थेमार्फत होते असे त्यांनी सांगितले, त्याचबरोबर हल्लीच्या युगामध्ये ज्या वयात शिक्षण घ्यायचे आहे त्या वयात काही बेरोजगार व गरजू विद्यार्थी हे व्यसनाधीन होतात त्यांना बळी न पडता आपण निर्भीडपणे राहणे गरजेचे आहे असे सांगितले.
टायगर ग्रुप च्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये खास मुलींसाठी कराटे, ज्यूडो, तायकांडो यासारख्या आत्मरक्षण करणाऱ्या खेळ खेळावे असेही त्यांनी सांगितले, या कार्यक्रमाचे सांगता समारंभ निसरड सर यांनी केले , हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता चेतन जावळे, अनिकेत जावळे, सुरेश पाटणकर, यश देवकुळे दीपक फाळके अमित कोडे सचिन वायदंडे व सर्व मित्र परिवार श्री साठे सर, माणिक जाधव सर यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुले मुली तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.