Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » पाचवड वाई रस्त्यावर अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी

पाचवड वाई रस्त्यावर अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी

पाचवड वाई रस्त्यावर अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पाचवड ते वाई जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या न्यु सरस्वती कोल्ड स्टोरेजच्या समोर सोमवारी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीने पुढे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या टेंपोला पाठीमागून जोराची धडक देवुन झालेल्या अपघातात चालक असलेला दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत .

या अपघाताची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी तातडीने सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी हवलदार उमेश गहिण गोरख दाभाडे मंगेश जाधव सागर नेवसे  या पोलिस पथकाला अपघात स्थळावर जाण्याचे आदेश दिले.या पोलिस पथकाने अपघात स्थळावर जावुन अपघातात मयत झालेले  संतोष उत्तम मोरे वय ४८ राहणार कुसगाव ता .वाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी वाईच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवला .तर जखमी लहु बाळकृष्ण निगडे वय ५२ राहणार धोम कोलनी वाई आणी दत्तात्रेय सदाशिव जायगुडे वय ५५ राहणार सिध्दनाथवाडी वाई या दोघांना उपचारासाठी पाठवले .

तसेच या भिषण अपघाताला जबाबदार असणारा टेंपो चालक निलप्पा शिवाप्पा वाल्मीकी राहणार सऊर ता. समनुर जि. हिवेरी राज्य कर्नाटक याला टेंपोसह ताब्यात घेऊन त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 1 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket