Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाचवड पोलीस चौकीला खड्ड्यांचे व पाण्याचे साम्राज्य

पाचवड पोलीस चौकीला खड्ड्यांचे व पाण्याचे साम्राज्य

पाचवड पोलीस चौकीला खड्ड्यांचे व पाण्याचे साम्राज्य

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)-

वाई – पुणे बेंगलोर रोड हा पाचवड तालुका वाई या हद्दीतून गेला असून तो रस्ता पाचवड तालुका वाई या रस्त्याला जोडला आहे या दोन्ही रस्त्याच्या कडेलाच पाचवड पोलीस मदत केंद्र(पोलीस चौकी) असून दोन्ही रस्त्याच्या मध्येच आहे परंतु रस्त्यावर पावसामुळे खड्डेच खड्डे झाले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्याने घाणीचे ही साम्राज्य दिसत आहे तसेच या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांना पाण्यातून खड्ड्यातून वाट काढत वाहने चालवावी लागत असून यामुळे मोठमोठे अपघात होण्याची शक्यता आहे हे रस्ते जावळी वाई पुणे सातारा या रस्त्याला जोडले असल्याने अवजड वाहनचालकांना व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे पाचवड हे तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी भाजीपाला व जनावरांचे बाजार आठवड्यातून भरले जात असतात तसेच या ठिकाणी कॉलेज व महाविद्यालय व बँक असल्याने विद्यार्थ्यांचीही वाहनातून मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या वाहनातून ये जा चालू असते तसेच या चौकीलगत मोठे बस स्थानक असून लांब पाल्याच्या गाड्या याठिकाणी आहेत परंतु या वाहनधारकांनाही खड्ड्यातून मोठी कसरत करीत ये जा करावी लागत आहे या पोलीस चौकीत ये जा करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनाही या पाण्यातून वाट काढत ये जा करावी लागत आहेया सर्व बाबींकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी वेळीच खड्डे भरून प्रवाशांचे व शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावे अशी सामान्य जनतेतून मागणी होत आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या: वैद्यकीय वर्तुळात खळबळ

Post Views: 40 सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या: वैद्यकीय वर्तुळात खळबळ सोलापूर – राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा

Live Cricket