पाचगणी : महाबळेश्वर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत
भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने घवघवीत यश संपादन करीत दोन गटातील संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. याबद्दल विजेत्या संघांचे अभिनंदन होत आहे.
पाचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिराच्या क्रीडांगणावर झालेल्या या तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार हा संघ विजेता ठरला तर जि.प.शाळा, खिंगर ने उपविजेतेपद पटकावले. 17 वर्षाखालील गटात इलाबेन हायस्कूल, तळदेवच्या संघाने विजेतेपद तर हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलारच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर 19 वर्षाखालील गटात इलाबेन ज्युनियर कॉलेज, तळदेवच्या संघाला विजेतेपद तर जे.पी. मेहता कॉलेज, पाचगणीच्या संघाला उपविजेतेपद मिळाले
हे सर्व विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाना महात्मा फुले विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री वरणे सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
हिल रेंजच्या संघाना प्रशिक्षक संगीता खरात यांनी मार्गदर्शन केले तर या विजयी संघांचे हिलरेंजचे चेअरमन नितीनदादा भिलारे, संचालिका तेजस्विनी भिलारे, सचिव जतीन भिलारे, मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, कल्पेश गायकवाड, प्रशिक्षक संगीता खरात, सुजाता पारठे, विनायक बगाडे, राजू मोरे, शांताराम जाधव, योगिता रांजणे यांनी अभिनंदन केले आहे.
