पाणी संघर्ष समिती वाई : 30 गावांचे साखळी उपोषण
प्रतिनिधी :पाणी संघर्ष समिती वाई यांच्या वतीने कवठे केंजल योजनेतून ग्राविटी ने पाणी मिळावे म्हणुन 30 गावांचे साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणास शिवसेनेच्या वतीने पत्र देऊन पाठींबा देण्यात आला. तसेच वाई विधानसभा अकार्यक्षम आमदारांचा निषेध करण्यात आला. मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई साहेब यांची वेळ घेऊन बैठक घेऊन हा प्रश्ण सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळेस शिवसेना उपजिल्हाप्रमुख, सदस्य जिल्हा नियोजन समिती सातारा श्री. प्रदीप दादा माने, वाई विधानसभा प्रमुख श्री. विकास आण्णा शिंदे, वाई तालुकाप्रमुख श्री. रविंद्र आप्पा भिलारे, तालुकाप्रमुख श्री. अक्षय चव्हाण,युवासेना विधानसभा प्रमुख श्री. योगेश फाळके, उपतालुकाप्रमुख श्री. गणेश सावंत, श्री. दिलीप पवार, युवासेना वाई शहर प्रमुख श्री. किशोर भगत, श्री. प्रतीक काळे मा. उपतालुकाप्रमुख श्री. मंगेश खंडागळे, शिरवळ शहरप्रमुख श्री. ज्ञानेश्वर भांडे, श्री. धनाजी बाबर, श्री. कृष्णा बरकडे, श्री. प्रमोद शिंदे, पप्पू जाधव, इ. उपस्थित होते.
