पाचगणी — शहर विकासासाठी बदलाची हाक; दिलीप भाऊ बगाडेंच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली असून नागरिकांच्या प्राथमिक गरजांची प्रभावीपणे पूर्तता करण्यासाठी आणि पाचगणीचा संपूर्ण कायापालट घडवून आणण्यासाठी आपण साथ द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप भाऊ बगाडे यांनी नागरिकांना केले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरलेले बगाडे यांच्या पदयात्रांना पाचगणीकरांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रत्येक भागात घरोघरी भेट देत ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेत तसेच आशीर्वाद स्वीकारत ते जनसंपर्क मोहिमेत गुंतले आहेत.
शांत स्वभाव, विकासाभिमुख भूमिका आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे दिलीप बगाडे यांच्या उमेदवारीला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून पाचगणीमध्ये सकारात्मक बदलाची आशा नागरिक व्यक्त करत आहेत.




