Post Views: 20
लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या तारखेला जाहीर होणार याकडे संपूर्ण जनतेचे विशेषतः सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेली आहे.
आज पाच मार्चला निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा होती. परंतु भारतात सुरू असलेले विविध राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेत केंद्र शासनाने निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करण्यास अल्पसा विलंब केला असल्याचे जाणवते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांमध्ये उदघाटन, पायाभरणी इत्यादी कार्यक्रमाचा सपाटा लावलेला आहे. त्यांचे हे कार्यक्रम दिनांक १३ मार्च पर्यंत असल्याचे समजते. त्यानंतरच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या तारखा जाहीर झाल्या नसल्यामुळे दिनांक १४ किंवा १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा केली जात आहे.
