ओंकार चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदी निवड
वाठार स्टेशन, :तळिये येथील ओंकार चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कोरेगाव तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
दहीगाव (ता. कोरेगाव) येथील कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी श्री. चव्हाण यांची निवड जाहीर केली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक रामभाऊ लेंभे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर आदींची उपस्थितीत होती. संघटनावाढीसाठी युवा नेतृत्वामुळे कोरेगाव तालुक्यात यांचा फायदा होणार असून येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल, असे उद्गार यावेळी नाईक-निंबाळकर यांनी काढले.
पक्षसंघटना मजबूत करताना नागरिकांच्या संबंधित विकासकामे, समस्या यावर लक्ष देणार असून वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास पाहता त्या मार्गाने काम करणार, अशी श्री. चव्हाण यांनी दिली. त्यांनी यापूर्वी तळीये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी व राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदी काम केले आहे.
या निवडीबद्दल श्री. चव्हाण यांचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगेश धुमाळ, सतीश धुमाळ, नागेश जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे, बाजार समितीचे माजी सभापती अजय कदम, किसन वीर कारखान्याचे संचालक ललित मुळिक, जितेंद्र जगताप, गुलाब जगताप, अजित भोईटे , दिलीप अहिरेकर, सुशील शिलवंत, हेमंत अहिरेकर, जीवन फडतरे, अक्षय चव्हाण, शुभम लोखंडे आदींनी अभिनंदन केले.
