Home » खेळा » स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळते – डॉ. अरुणाताई बर्गे

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळते – डॉ. अरुणाताई बर्गे

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळते – डॉ. अरुणाताई बर्गे 

गौरीशंकर देगाव फार्मसी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

देगाव – स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने चालना मिळते असे मत प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ अरुणाताई बर्गे यांनी व्यक्त केले ते महासैनिक भवन येथे गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाच्या दृष्टी 2024 वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ नागेश अलूरकर, डॉ. अविनाश भोसले. प्रबंधक हेंमत काळे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मंजिरी जाधव, सानुजा कदम अदि प्रमुख उपस्थित होते.

डॉ अरुणाताई बर्गे पुढे म्हणाले की जीवनात पाहिलेली उत्तुंग स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी औषध निर्माण क्षेत्रातील बदलती समीकरणे पाहता विद्यार्थ्यांनी नाविण्यतेचा ध्यास घ्यावा.

डॉ अनिरुद्ध जगताप म्हणाले की कला संस्कृतीची साधना करताना त्यामधील कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत तसेच औषध निर्माण शास्त्र शाखेविषयी सार्थ अभिमान बाळगून फार्मसिस्टचे कर्तव्य बजवावीत.

यावेळी विद्यापीठाच्या यादीत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी बरोबरच विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उचित सत्कार डॉ अरुणाताई बर्गे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर, डॉ. अविनाश भोसले, डॉ. मनोज शिंदे, प्रा. स्पशी बांदेकर यांनी संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफिया इनामदार व अनुष्का साळुंखे हिने केले व आभार प्रा. मंजिरी जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा जिमखान्यातील विद्यार्थी व विद्यार्ध्यानी परिश्रम घेतले.

वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स ,कॉकटेल डान्स, फॅशन शो, नाट्य व एकांकिका गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रमातून कला अविष्काराचे सादरीकरण करून रसिक मनाची मने जिंकली.

गौरीशंकरच्या शैक्षणिक कार्याला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. नजीकच्या काळात औषधी निर्माण क्षेत्रातील ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी फार्मासिस्ट अभियाना अंतर्गत त्यांच्या कलागुणांना व करिअरला नवी दिशा देण्याचे एक व्यासपीठ उभारणार असल्याची माहिती ही डॉ. अरुणाताई बर्गे यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 70 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket