एकही तरुण बेरोजगार राहणार नाही!” — सुशीलदादांचा प्रभाग 3 मध्ये आक्रमक झंझावात
सातारा │ प्रभाग 3 रक्षक प्रतिष्ठानचे प्रमुख सुशीलदादा मोझर यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील दोन अपक्ष उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आव्हान देत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रचारसभेत बोलताना त्यांनी प्रभागातील तरुण-तरुणींना ठोस आश्वासने दिली.
सुशीलदादा म्हणाले की, “प्रभागातील कोणताही तरुण बेरोजगार राहणार नाही, हे मी पक्के वचन देतो.” सदरबाजार परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आयपीएस–आयएएस सारख्या उच्च पदांवर पोहोचण्याची तयारी करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
रक्षक प्रतिष्ठानच्या अपक्ष उमेदवारांच्या मागे सदरबाजार आणि परिसरातील जनता भक्कमपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त करत सुशीलदादांनी मतदारांना उमेदवारांच्या बाजूने एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.
प्रभाग 3 मध्ये रक्षक प्रतिष्ठानचा प्रचार जोर धरत असून, सुशीलदादांच्या नेतृत्वामुळे निवडणुकीत अनपेक्षित समीकरणे तयार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.




