कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » देश » निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक, मतदार ओळखपत्र, आधारशी जोडणीवर चर्चा

निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक, मतदार ओळखपत्र, आधारशी जोडणीवर चर्चा

निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक, मतदार ओळखपत्र, आधारशी जोडणीवर चर्चा

 मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १८ मार्चला केंद्रीय गृह सचिव आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे सचिव यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्रे आधारशीकार्डशी  जोडण्याबद्दल चर्चा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोळ होत अल्याचे आरोप होत आहेत. विशेषत: लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने याविषयी आक्रमक भूमिका घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे.

निरनिराळ्या राज्यांमध्ये दुबार मतदार ओळखपत्रे आढळल्यानंतर, भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग मतदारयाद्यांमध्ये घोळ करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. लोकसभेतही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अशीच टीका केली होती. मात्र दुबार मतदार ओळखपत्र हा जुनाच मुद्दा आहे असे म्हणत त्यावर तीन महिन्यांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच दुबार मतदार ओळखपत्र म्हणजे बनावट मतदार नव्हेत असाही दावा आयोगाने केला आहे. मतदार ओळखपत्र आणि आधारची जोडणीसाठी कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही असे केंद्र सरकारने संसदेत यापूर्वी सांगितले आहे. तसेच ओळखपत्र आधारशी जोडलेले नसेल तर असे नाव मतदारयादीतून वगळण्यात येणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

ही बैठक तात्पुरती मलमपट्टी असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. दुबार मतदार क्रमांक तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याबाबत जे स्पष्टीकरण आयोगाने यापूर्वी दिले आणि आताची बैठक पाहता बचाव करण्याचा प्रयत्न असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील उपनेत्या खासदार सागरिका घोष यांनी केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket