विकासाची नवी दिशा — पारस सुरेश परदेशी प्रभाग 1अ मधून मैदानात
पाचगणी-पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभाग क्रमांक १अ मधून पारस सुरेश परदेशी यांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी लढवत आहेत. प्रभागातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्त्यांची सुधारणा, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाल्यास प्रभाग 1अ आदर्श प्रभाग बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे परदेशी यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच प्रचार मोहीम अधिक व्यापक पातळीवर राबवण्यात येणार आहे.




