नवरात्र उत्सव २०२५ आढावा बैठक मांढरदेव येथे संपन्न
वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)मांढरदेव, ता. वाई दि. २१ सप्टेंबर २०२५ मांढरदेव देवस्थान ट्रस्टतर्फे आज सकाळी १०:०० ते १२:३० या वेळेत एमटीडीसी हॉल, मांढरदेव येथे नवरात्र उत्सव २०२५ बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे मा. चेअरमन तथा अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश,आर एम मेहेरे वाई हे होते.
या बैठकीत नवरात्र उत्सव काळातील बंदोबस्त व अन्य सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मा. चेअरमन यांनी बंदोबस्त व नियोजनाविषयी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. मंदिर परिसरातील सुरक्षेचा आढावा घेऊन योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाई पोलीस स्टेशनमार्फत बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, उत्सव काळात ३ पोलीस अधिकारी, १६ पोलीस अंमलदार, ४ आर्म गार्ड अंमलदार आणि २२ होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.
या बैठकीस मा. सुनिल साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग), उपविभागीय अधिकारी वाई (प्रांत), तहसीलदार वाई, तहसीलदार भोर, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, आपत्कालीन विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य उपस्थित होते.
उत्सव काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुविधांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
