महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीची एकजूट नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदेनां वाढते जनसमर्थन
महाबळेश्वर प्रतिनिधी –महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद निवडणूक 2025 ची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वरसाठी भक्कम विकासनिश्चयाची घोषणा केली आहे. पक्षाने शहराचे विजन असलेले नेते सुनील लक्ष्मण शिंदे यांना नगराध्यक्षपदाची संधी देऊन अनुभव आणि तरुणाईचा समतोल साधला आहे.
शंभर कोटींचा विकासनिधी – मागील कामगिरी दमदार “मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या पाठबळावर महाबळेश्वरसाठी 100 कोटींहून अधिक निधी आणण्यात आला आहे. पुढील काळात हा वेग अधिक वाढवू असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.
प्रमुख मंजूर प्रकल्प :
वेण्णा लेक बाह्यवळण रस्ता – ₹25 कोटी
पार्सनेज मार्केट, वाहनतळ व शॉपिंग कॉम्प्लेक्स – ₹15 कोटी
श्री संत बसवेश्वर महाराज चौक लेझर शो – ₹16 लाख
विविध सोसायट्यांसाठी अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी – ₹74 लाख
पांचगणी–महाबळेश्वर मार्ग अंडरग्राउंड केबल काम लवकरच सुरू
महाबळेश्वरला स्मार्ट आणि पर्यटनासाठी देशात नंबर वन करण्याचा संकल्प
सुनील शिंदे यांच्या मते, आधुनिक महाबळेश्वरसाठी खालील महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जाणार आहेत—
● स्वच्छता व पर्यावरण
डम्पिंग ग्राउंडवर अत्याधुनिक कचरा विलगीकरण प्रकल्प
जैविक पद्धतीने कचऱ्याचे विघटन
शहरात सौरऊर्जा वापरासाठी विशेष प्रोत्साहन
● पर्यटन विकास
जंगल राईड, घोडागाडी व बग्गी सफारी सुरू
नवे पर्यटक पॉईंट विकसित
वेण्णा लेकवर घोडेवाल्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक
अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे
● शहर सुशोभीकरण व पायाभूत सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, व डॉ.साबणे रोडचे सुशोभीकरण अजेंड्यावर असणार आहे.
24 तास पाणीपुरवठा योजना
शहरातील महत्त्वाच्या भागांत पेव्हिंग ब्लॉक्स
महाबळेश्वर–पांचगणी रस्ता ‘हेमया’ तंत्रज्ञानाने तयार
● सामाजिक व शैक्षणिक उपक्रम
अद्ययावत हॉस्पिटलचा विस्तार
गरजू विद्यार्थ्यांसाठी आधुनिक वस्तीगृह
बेघरांसाठी घरांची योजना
टपरी स्टॉल धारकांचे पुनर्वसन
अत्याधुनिक सांस्कृतिक दालन व नाट्यगृह
धोबीघाटाचे आधुनिकीकरण
● स्मार्ट प्रशासन
प्रवासीकर व प्रदूषणकरासाठी फास्टटॅग यंत्रणा
शहरातील संपूर्ण ड्रेनेज यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीने
“महाबळेश्वरला पर्यटन, आरोग्य, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत नवा आयाम देऊ. नागरिकांनी साथ दिल्यास शहराचा चेहरा बदलू,” असे सुनील शिंदे यांनी ठामपणे सांगितले.




