राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे जल्लोषी स्वागत
शिवथर.(सुनिल साबळे) -महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून तसेच जेसीबीच्या साह्याने पुष्प दृष्टी करत ढोल ताशाच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आला तसेच यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबा यांना देखील पुष्पहार घालून अभिवादन केले.
आमदार शशिकांत शिंदे यांचे मंगळवारी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद दिले गेले त्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाले ठीक ठिकाणी त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले
निष्ठा कशी असावी याच ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय शरदचंद्र पवार व आमदार शशिकांत शिंदे ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली गेली त्यावेळी अगदी मोजकेच आमदार आणि खासदार शरद पवारांच्या कडे राहिले होते त्यानंतर बऱ्याचदा राष्ट्रवादी पक्षावर संकट आली परंतु त्या संकटावर मात करत शरद पवारांनी जो जो शब्द शशिकांत शिंदेंना टाकला आणि पक्षासाठी त्यांनी तो पाळला दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणूक मध्ये पराभव पत्करून सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निवडीवेळी कोणीही तयार नसताना परंतु इच्छा नसून सुद्धा पवार साहेबांच्या शब्दाखातर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणारा एकमेव नेता म्हणजे शशिकांत शिंदे त्या निष्ठेच फळ शरद पवारांनी पूर्णतः विचारपूर्वक निर्णय घेऊन प्रदेशाध्यक्ष पद त्यांना दिल गेल.
इतर पक्षातील नेत्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना फोडण्याचा प्रयत्न केला परंतु गद्दारी करायची नाही आणि शेवटपर्यंत शरद पवार यांना सोडायचं नाही हाच निश्चय शशिकांत शिंदे यांनी केला होता त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच प्रदेश अध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. त्यामुळेच सातारा नगरीमध्ये त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं.





