Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – आयोजित शिवस्वराज्य यात्रा …वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – आयोजित शिवस्वराज्य यात्रा …वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – आयोजित शिवस्वराज्य यात्रा …वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात 

वाई प्रतिनिधी: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची शुक्रवार दि.९ ऑगस्ट या क्रांतिदिनी आपल्याला सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्शिवादाने पावनभूमी किल्ले शिवनेरी,ता.जुन्नर,जिल्हा पुणे येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्यातुन यशस्वी होवून आता वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात बुधवार दि.१६ ऑक्टोबर २०२४ रोजी वाई येथे सकाळी १०.३०।वाजता PWD चौकातून पोस्ट ऑफिस।किसनवीर चौक मार्गे मोटारसायकल रॅलीने यात्रेचे ठिकाणी न्यू चित्रा टॉकीज येथे संपन्न होणार आहे.अशी माहीती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने डॉ.नितीन सावंत,प्रसाद सुर्वे,ऍड निलेश डेरे,विजयसिंह पिसाळ,दिलीप बाबर, यशराज भोसले यांनी दिली.

     शिवस्वराज यात्रा वाई मध्ये बुधवार दि 16 रोजी येणार असून सदर यात्रेस प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब,खा.डॉ.अमोल कोल्हे साहेब,आ.जितेंद्र आव्हाड, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब भाई शेख, प्रदेश महिला अध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे, युवती प्रदेश अध्यक्षा सुलक्षणाताई सलगर,प्रदेश विध्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे व प्रदेशचे इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आपल्या सातारा जिल्हातील नेते माजी खा. श्रीनिवास पाटील,आ.बाळासाहेब पाटील,आ.शशिकांत शिंदे,पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील तसेच सातारा जिल्हातील पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सकाळी १० वाजता प्रसिध्द कलाकारांचे छोटेखानी लोकनाटय सादर होणार आहेत. याच्या नियोजन मोठी बैठक नुकतीच झाली व या मतदार संघातील सर्वांनी उस्फुर्तपणे या शिवस्वराज्य यात्रेत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.

    यावेळी अनिल जगताप ,कैलास जमदाडे,संतोष शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 54 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket