प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार लाट — सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहुल पिसाळ व प्रियांका वायदंडे यांच्या मतदार गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
महाबळेश्वर : येथील क्रमांक ८ प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल पिसाळ आणि प्रियांका वायदंडे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनिल शिंदे यांच्या उपस्थितीत मतदार गाठीभेटींचा शुभारंभ केला. या गाठीभेटीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.
प्रभागातील विविध मतदारांशी संवाद साधताना तीनही उमेदवारांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. युवकांसाठी रोजगार, महिलांच्या सुरक्षेची उपाययोजना, पाणीपुरवठा, रस्ते-दिवे यांसारख्या मूलभूत सुविधांच्या उन्नतीवर राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदारांनी उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत करत “विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज” असल्याचे सांगत पाठिंबा दर्शवला. प्रभागात सर्वत्र सकारात्मक वातावरण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरतो आहे.
आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आणि सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता पक्षाच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.




