Home » राज्य » कूपर कार्पोरेशन मध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा

कूपर कार्पोरेशन मध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा

कूपर कार्पोरेशन मध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा

कूपर कार्पोरेशन प्रा. लि. च्या सर्व युनिटमध्ये ४ मार्च ते ११ मार्च हा सप्ताह राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह म्हणून विविध कार्यकमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला सप्ताहाची सुरूवात सर्व युनिट मध्ये सुरक्षितता शपथ घेऊन करण्यात आली. कंपनीचे एच आर विभागाचे सी. एच. आर.ओ. श्री. नितीन देशपांडे, डायरेक्टर श्री रामेश जाधव, सी सी ओ अस्लम फरास आणि सर्व अधिकारी, कामगार व कर्मचारी उपस्थित होते. सदर राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहामध्ये व पूर्ण वर्षभर “शुन्य अपघात” हे कूपर कार्पोरेशनचे ध्येय असेल याची सर्वानी एकमताने शपथ घेतली. कंपनी व्यवस्थापनाच्यावतीने सेफ्टी मॅनेजर श्री अजित साबळे व त्यांच्या संपूर्ण टिमने सदर राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहामध्ये नाविण्यपूर्वक सुरक्षा प्रशिक्षणांचे कार्यकम घेतले तसेच औद्योगिक सुरक्षितता सप्ताह या विषयावर सुरक्षितता पोस्टर, निबंध, घोषवाक्य व प्रश्न मंजुशा ई. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये कामगार व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

सदर स्पर्धाचा बक्षिस वितरण समारोह औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे निवृत्त सह. संचालक व एस एम टेक्नोसेफ चे डायरेक्टर श्री सुरेश कारंडे व मधुमिलन शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात सर्वप्रथम श्री नितीन देशपांडे यांनी पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन उत्कृष्ठतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करण्या संर्दभात मोलाचे मार्गर्दशन केले त्याच बरोबर श्री. सुरेश कारंडे व मधुमिलन शिंदे यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक केले व सुरक्षितता सप्ताह मागील भूमिका विषद केली.

सदर कार्यक्रमामध्ये कामगारांनी सुरक्षितता व सुरक्षितता साधनांचे महत्व पटवून देणारे लघुनाट्य आणि भजन समर्पकरित्या सादर केले कार्यकमाचे आभार प्रदर्शन श्री अजित साबळे यांनी केले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket