राष्ट्रीय पातळीवरील ‘हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा’ साताऱ्यात-गौरव रोशनलाल(राष्ट्रीय महासचिव)
राजेश्वर प्रतिष्ठाण, सातारा संस्थापक : साहेबराव आबाजी पवार,अध्यक्ष : सुधीर साहेबराव पवार यांच्या नेतृत्व मध्ये हिंदकेसरी स्पर्धा होणार
सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही भव्य स्पर्धा अखिल भारतीय शैली कुस्ती महासंघ, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठाण, सातारा यांच्या वतीने आयोजित केली जात आहे.
सदर स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा येथे दिनांक २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.या स्पर्धेसाठी देशभरातील २६ राज्यांमधील पुरुष व महिला संघ, तसेच भारतीय सेनादल, वायुसेना, बीएसएफ, रेल्वे आदी ७ सेवा संघांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण ५०० पुरुष मल्ल आणि २५० महिला मल्ल या स्पर्धेत झुंज देणार आहेत.
स्पर्धा पारंपारिक मातीच्या आखाड्यावर आयोजित केली जाणार असून, सातारा व परिसरातील नागरिकांसाठी हा एक नेत्रदीपक कुस्ती महोत्सव ठरणार आहे.या स्पर्धेचे अंदाजे बजेट सुमारे पाच कोटी रुपये इतके असून, देशातील सर्वात मोठ्या बक्षिसाची ‘हिंदकेसरी’ स्पर्धा म्हणून ही नोंद होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी या भव्य स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे राजेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.यावेळी मदन पवार, दीपक पवार व मान्यवराची उपस्थिती होती.
