Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बाल शिवाजी युवा प्रतिष्ठान व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बाल शिवाजी युवा प्रतिष्ठान व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन 

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बाल शिवाजी युवा प्रतिष्ठान व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन 

सातारा- राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,बाल शिवाजी युवा प्रतिष्ठान व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा मार्फत साताऱ्यामध्ये आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेतृत्व सादिक शेख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, पंतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना व तसेच संजवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेशा आरोग्याचा अभियांनांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.गणेशोत्सव कालावधीत आरोग्यविषयक हा उपक्रम महत्त्वाचा आहे. दरवर्षी मंडळांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. या वेळी रुग्णांची प्राथमिक तपासणी, मोफत रक्तचाचण्या, ईसीजी व अनुषंगिक सर्व तपासणी करण्यात आल्या.पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना आरोग्यविषयक शासकीय योजनांतून उपचारार्थ मार्गदर्शनपर सहाय्य करण्यात येणार आहे. 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरबाज शेख, अजिंक्य कदम, कार्यकर्ते उपस्थित होते. संजीवन हॉस्पिटल च्या वतीने डॉ. प्रशांत लवळे, डॉ.नीती यादव, सलीम बागवान, भिकाजी देशमुख, अरुण भिसे, व संजवीन नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थी यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 322 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket