Home » ठळक बातम्या » यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये महिला दिनानिमित्त ‘नारी सन्मान उपक्रम’ उत्साहात संपन्न

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये महिला दिनानिमित्त ‘नारी सन्मान उपक्रम’ उत्साहात संपन्न

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये महिला दिनानिमित्त ‘नारी सन्मान उपक्रम’ उत्साहात संपन्न

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये दरवर्षी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समाजव्यवस्थेचा मूळ पाया आणि आधार असलेल्या महिलांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा हा दिन यावर्षी देखील नारी सन्मान उपक्रमा सोबत मोठे उत्साहात साजरा करण्यात आला. कुटुंबासोबतच करिअरची जबाबदारी पार पाडत असताना, महिलांनी यशाची अनेक शिखरे पदाकांत करण्याचे कार्य केले आहे. यापुढेही समाजाला दिशा देण्यासाठी महिलांनी कार्यरत राहावे असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशोदा इन्स्टिट्यूटच्या सचिव सौ साधना सगरे या उपस्थित होत्या.

यशोदा इन्स्टिट्यूट च्या वतीने जागतिक महिलादिनी  नारी सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित महिला उपस्थित होत्या. त्यामध्ये मानवी हक्क संघटना महाराष्ट्र अध्यक्ष सौ. रेणू येळगावकर, काटदरे फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड च्या सौ. शैलजा काटदरे, उद्योजिका सौ कविता वनारसे यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. विविध क्षेत्रात कार्य करणारे या महिलांचा यशोदा इन्स्टिट्यूट च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचा इतिहास उलगडताना यशाला गवसणी घालण्याची क्षमता नारी मध्ये आहे आणि नारीशक्ती शिवाय कोणतीही समाजव्यवस्था ही अपूर्ण असल्याचे मत यशोदा इन्स्टिट्यूटच्या सचिव आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ साधना सगरे यांनी व्यक्त केले.

सौ. रेणू येळगावकर यांनी विद्यार्थिनींसाठी उपयुक्त मानवी अधिकार व हक्क याबाबत सविस्तर माहिती दिली आणि करिअर कडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे देखील आवाहन केले. सौ काटदरे यांनी उद्योगाकडे आणि उद्योजक तिकडे करिअर म्हणून बघण्याचा सल्ला दिला पारंपारिक व्यवसाय आणि काळानुरूप त्यामध्ये होणारे बदल याविषयी देखील त्यांनी उपस्थित त्यांना माहिती दिली.

यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी यांनी देखील नारीशक्तीच्या या संघटनेसाठी आणि त्यांच्या कर्तुत्वासाठी विशेष शुभेच्छा देताना महिला दिनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृता मोहिते यांनी केले, सुप्रिया मंद्रूपकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्मिता पाटील यांनी मुलाखती घेतल्या, तर डॉ. भारती चावरे यांनी आभार मानले. प्रांजली गाडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी यशोदा इन्स्टिट्यूट मधील सर्व महिला पदाधिकारी शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. यावेळी महिला आणि विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 88 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket