औषधनिर्माण क्षेत्रातील क्लिनिकल ट्रायल्समध्ये विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी – नमिता राठोड
लिंब – औषध निर्माण क्षेत्रातील उच्च ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लिनिकल ट्रायल्स (संशोधन ) क्षेत्रात उज्वल करिअरची मोठी संधी आहे असे मत झेओस हेल्थ पुणे च्या संस्थापक संचालिका नमिता राठोड यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात औषधनिर्माण क्षेत्रातील बदलती आव्हाने यामधील करिअरची संधी या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, विभाग प्रमुख डॉ. संतोष बेल्हेकर, किरण ताटे, प्रा.डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. दुधेश्वर क्षीरसागर, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
नमिता राठोड पुढे म्हणाल्या की औषध कंपन्या जेव्हा दुर्धर आजारावर मात करण्यासाठी औषध निर्मिती करतात त्यावेळी विविध चाचण्यांची पडताळणी करूनच ते बाजारपेठेत औषध उपलब्ध करून देतात अर्थात ही औषधे बाजारपेठेत येताना यावरती केले जाणारे संशोधन व घेतली जाणारी ट्रायल्स याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतली पाहिजे.
उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की संपूर्ण विश्वात भारत औषधनिर्मिती मध्ये अग्रेसर आहे नजीकच्या काळात क्लिनिकल रिसर्चचे ते केंद्रबिंदू ठरेल मानवी जीवनाशी निगडित असणाऱ्या या क्षेत्रात काळानुसार बदल घडत आहेत विद्यार्थ्यांनी क्लिनिकल ट्रायल्स या विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करावे.
प्रारंभी झेओस हेल्थचे संस्थापक संचालिका नमिता राठोड यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर औषध निर्माण क्षेत्रात क्लिनिकल ट्रायल्स मध्ये केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला तसेच झेओस हेल्थ कंपनी पुणे यांच्याशी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाने शैक्षणिक करार केला या करारावर उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव व झेओस हेल्थचे संस्थापक संचालिका नमिता राठोड यांनी स्वाक्षरी केल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन गावदे हिने केले
औषध निर्मात्यांनी उत्पादित केलेल्या नाविन्यपूर्ण औषधाचे अचूक तपासणी करण्याकरिता क्लिनिकल ट्रायल्सच्या माध्यमातून ते बाजारपेठेत उपलब्ध करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या विविध प्रक्रिया व चाचण्यांची पङताळणी करण्याकरिता करावी लागणारे संशोधनात्मक बाबतचे निरीक्षण व त्याची पडताळणी याचबरोबर औषधांची उपयुक्तता व मानवी जीवनाच्या सुरक्षेतेबाबतची दक्षता घेण्यासाठी प्रथम प्राणीमात्रावर केले जाणारे प्रयोग व त्यानुसार आलेले निष्कर्षाच्या आधारे औषधाची उपयुक्तता सिद्ध होते. काळानुसार यामध्ये क्रांतिकारी बदलून घडत असून तंत्रज्ञानाच्या साह्याने हे क्षेत्र अधिक गतिमान होत आहे औषध निर्माण क्षेत्रात क्लिनिकल ट्रायल्स मध्ये विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी आहे.