Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ‎नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी अमित कुलकर्णी वार्षिक सभा उत्साहात; उपाध्यक्षपदी अतुल दोशी यांची निवड

‎नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी अमित कुलकर्णी वार्षिक सभा उत्साहात; उपाध्यक्षपदी अतुल दोशी यांची निवड 

‎नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी अमित कुलकर्णी वार्षिक सभा उत्साहात; उपाध्यक्षपदी अतुल दोशी यांची निवड 

‎सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार झाला. पाठक हॉलमध्ये नुकतीच सर्वसाधारण सभेत एकमताने नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी अमित कुलकर्णी व उपाध्यक्षपदी अतुल दोशी यांची निवड करण्यात आली. 

‎श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवानिमित्त (१७५), तसेच सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रंथ मित्र पॅनेलचे प्रमुख अमित कुलकर्णी यांचा प्रयत्न होता. त्यानुसार नगरवाचनालयाच्या विश्वस्त मंडळाच्या चार आणि कार्यकारी मंडळाच्या आठ अशा १२ जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विश्वस्त मंडळासाठी विजयराव पंडित, अजितराव कुबेर, अनंतराव जोशी, अतुल शालगर हे चारच अर्ज दाखल झाल्यामुळे या चारही जागा बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले. कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अमित कुलकर्णी, मुकुंद आफळे, महेश शिवदे यांनी प्रयत्न सुरू केले. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विजय मांडके व गौतम भोसले यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार श्री. मांडके व श्री. भोसले यांनी केवळ वाचनालयाच्या हितासाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी वैदेही कुलकर्णी, प्रकाशराव शिंदे, डॉ. राजेंद्र माने, प्रसाद गरगटे, रवींद्र भारती-झुटिंग, प्रदीप कांबळे, जयंत देशपांडे, नारायण जाधव हे आठच अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर रविवारी झालेल्या नगरवाचनालयाच्या निवडणुकीत अमित कुलकर्णींची सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी अतुल दोशी यांची निवड झाली तर स्वीकृत सदस्य पदी डॉ. श्याम बडवे यांची निवड झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. नितीन शिंगटे यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल अमित कुलकर्णी व अतुल दोशी यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. 

‎नगरवाचनालयाची शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. है ऐतिहासिक वाचनालय सातारा शहर आणि परिसरात पिढ्यान् पिढ्या वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम करत आहेत. शहराच्या वैचारिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. ही परंपरा कायम ठेवून घराघरांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहील. 

‎- अमित कुलकर्णी 

‎अध्यक्ष, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 63 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket