माय बिट्स स्टुडिओ व दिपलक्ष्मी पतसंस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने,”तू तेंव्हा तशी”हा जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित उपक्रमास उदंड प्रतिसाद
सातारा -दिपलक्ष्मी पतसंस्था सभागृहांत अभूतपूर्व श्रोत्यांच्या प्रतिसादात,”माय बिट्स स्टुडिओ व दिपलक्ष्मी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने,”तू तेंव्हा तशी”हा जागतिक महिला दिनानिमित्त खास आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी डॉ लियाकत शेख व त्यांच्या गायक सहकाऱ्यांनी सहभाग दिला, ह्यामध्ये शेख सरांनी आणि इतरांनी महिलांच्या विविध रूपावर प्रकाश टाकणारी मराठी,हिंदी गीते सादर केली.यात आई,बहीण ,मैत्रीण, प्रेयसी व महिलांचि अनेक रूपे व त्यांच्या भावना समजवून सांगणारी अवीट गोडीची व विविध चाली असणारी गीते पेश करण्यात आली.
कलाकारांमध्ये सौ वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित,ममता नरहरी,कलाचांद,सारिका हेंद्रे तसेच प्रा राजेंद्र कुमार निकम,गणेश शिंदे ,जतीन शिंदे ह्यानी अप्रतीम गाणी सादर केली,तर डॉ लियाकत शेख सर ह्यांनी,”सौ सोनारकी, एक लोहारकी”ह्या म्हणी प्रमाणे,मुकेशजींचे गाणे “सजन रे झूट मत बोलो”हे गाणे सादर केले!एक अत्यन्त उंचीचा कार्यक्रम रसिकांना अनुभवता आला!सर्वांचे अभिनंदन.
या कार्यक्रमाचे उदघाटन गायक आणि संगीतकार संजय दीक्षित,सौ सुरेखा शेजवळ,दिलीप चरेगांवकर,अनिल वाळिंबे,शिरीष चिटणीस व लियाकत शेख यांचे हस्ते करण्यात आले.रसिकांच्या तुडुंब गर्दीत ३ तास कार्यक्रम चालू होता.चित्रा भिसे यांनी अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले तसेच २ गाणीही गायली.लियाकत शेख यांच्या ‘ माय बिट्स स्टुडिओ ‘ चा हा पहिलाच कराओके चा कार्यक्रम होता.
