‘सातारा डायग्नोस्टिक’ मध्ये मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी
सातारा, दि. ९ : रोबोटिक सर्जरी मधील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे पुण्याच्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोस्कोपी विभागाचे प्रमुख आणि एकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १२ डिसेंबर रोजी डॉ. गिरी यांच्या उपस्थितीत सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे गुडघा व खुबे वेदना मोफत तपासणी शिबीर होणार आहे.
सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, एम.डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट व हेलिओस ऑरथोजॉइंटचे ऑरथोपेडिक सर्जन डॉ. सौरभ-गिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
देवी कॉलनी, सदरबझार येथे सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर होईल. शिबिरात ५० टक्के सवलतीच्या दरात एक्स-रे स्क्रिनिंग केले जाणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात चालता येते. जलद रिकव्हरी होत असल्याने या तपासणी शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार येथे नाव नोंदणीसाठी मोबाईल ९१६८४३२४३२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.
रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रियाच का?
“ही शस्त्रक्रिया पारंपारिक शास्त्रक्रियेपेक्षा खूपच आधुनिक आहे. त्यामध्ये शस्त्रक्रियेनंतर किमान वेदना कमीतकमी असतात. रक्तस्रावही कमीतकमी असतो. यामध्ये हाडांचे नुकसान टाळता येते. अचूकता असल्यामुळे सांध्यांचे आयुष्य वाढते. सांध्यांचे संरेखन उत्तम असते. जलद रिकव्हरी होत असल्याने शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्ण चालू शकतो”
डॉ. सौरभ गिरी
रोबोटिक सर्जरी तज्ज्ञ
