मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न श्रीकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद
सातारा – लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच म्हणून परिचित असलेल्या श्रीकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महागणेश मंदिर, राजधानी सातारा सत्वशीला नगर येथे 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे 75 नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
शिबिरात नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सवलतींचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला.
या शिबिरासाठी “मास” एमआयडीसी सातारचे मा. अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे व्यवस्थापक श्री कुलदीप मोहिते, टेक्निशियन टीमचे श्री प्रशांत कदम, श्री किरण आहिरे, डॉ. प्रवीण जाधव, अमित टेलरचे श्री अमित जाधव, श्री आनंदराव कणसे, श्री दादासाहेब जाधव, ऍड. सागर जाधव, श्री सुभाष मगर, श्री रमेश मगर, उद्योजक संतोष सोनमळे, श्री रवि पवार सामाजिक कार्यकर्ते, श्री अविनाश पवार, मकरंद वेदपाठक, विजय पाटील, सदाशिव माने,निलेश साळुंखे, किरण काळे, मंदार जाधव,तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून श्रीकांत देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
फ्लेक्स, जाहिरातींवर खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली, एमआयडीसी कॉर्नर रहिमतपूर, ऍट युवर सर्व्हिस अँड कॉन्ट्रॅक्ट्स, सत्वशीलानगर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक कार्याची परंपरा जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




