Home » राज्य » मंत्री मकरंदआबा पाटील यांचे हात बळकट; अनिल (आबा) जगताप राष्ट्रवादीत दाखल

मंत्री मकरंदआबा पाटील यांचे हात बळकट; अनिल (आबा) जगताप राष्ट्रवादीत दाखल

मंत्री मकरंदआबा पाटील यांचे हात बळकट; अनिल (आबा) जगताप राष्ट्रवादीत दाखल

वाई ( प्रतिनिधी)-वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा वाई तालुक्यातील प्रभावी नेते अनिल (आबा) जगताप हे मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजितदादा पवार गट) घरवापसी करणार आहेत.

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंदआबा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी अनिल (आबा) जगताप हे पूर्ण ताकदीनिशी मदत करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि तालुक्यातील संघटनात्मक बांधणीचा निश्चितच राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार आहे.

अनिल (आबा) जगताप यांचा पक्षप्रवेश लवकरच पार पडणार असून, या प्रवेशामुळे वाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र आहे. याचा थेट परिणाम पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसून येईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आक्रमक भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा गट पूर्ण ताकतीनिशी यावेळी मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

एकूणच, या घरवापसीमुळे वाई तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पुन्हा एकदा मजबूत स्थितीत येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket