मंत्री जयकुमार(भाऊ )गोरे यांना पितृशोक
सातारा -ग्रामविकासमंत्री जयकुमार (भाऊ)गोरे यांचे वडील श्री.भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
भगवानराव गोरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव आज दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर बोराटवाडी ता. माण येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.




