जिल्ह्यात महायुतीच्या विजयासाठी खा.नितीन पाटील यांचे मायक्रो प्लॅनिंग
सातारा: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाचे खासदार नितीन पाटील हे जोरदार सक्रीय झाले असून जिल्ह्यात सर्वच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडूण आणण्यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दिवंगत नेते लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी केली होती. त्यामुळे त्यांना माणणारा मोठा गट जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहे. हा गट सक्रीय करुन महायुतीचे सर्वच उमेदवार निवडूण आणण्यासाठी खा. नितीनकाका यांनी नियोजन केले आहे. मात्र विशेषतः चार विधानसभा मतदारसंघावर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. फलटण, कोरेगाव, कराड उत्तर आणि वाई या मतदार संघाचा त्यामध्ये समावेश आहे. पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांश्ी चर्चा करुन त्यांना त्यांनी कामाची दिशा दिली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या बैठका घेउन त्यांनी त्यांना सक्रीय केले आहे. चारही विधानसभा मतदारसंघात बुथनिहाय आढावा त्यांनी घेतला आहे. कुठेही महायुती कमी पडणार नाही यासाठी त्यांनी जातीने लक्ष देवून परफेकट नियोजन चालु केले असून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होईल या दृष्टीने पावले टाकली आहेत.
लक्ष्मणराव पाटील यांना माणणारा गट नेहमीच खा. नितीनकाकांनी सक्रीय ठेवला होता. हाच गट आता चारही विधानसभा मतदार संघात विजयाचा शिल्पकार ठरेल आणि महायुतीला मोठे यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना येत्या काळात दिसणार आहे.राज्यातील महायुती सरकार मधील राष्ट्रवादी कॉग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे
आपल्या कार्यकर्त्यांनी सर्वाधिक योगदान द्यावे : खा. पाटील
महायुतीमध्ये आपल्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन प्रमुखांपैकी एक प्रमुख आहेत. शासनाच्या लाडकी बहिण योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी अजितदादांनीच निधीची तरतूद केली आहे. विरोधक शासनाच्या सर्व योजना बंद करण्याची शक्यता आहे. जनतेच्या हिताचे कामकाज व्हायचे असेल तर महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आणावी लागणार आहे. त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे योगदान सर्वाधिक असायला हवे, अशी प्रतिक्रिया खा.नितीन पाटील यांनी दिली आहे.