मेढा येते भारतीय आयुर्विमा महामंडळ सातारा शाखा क्रमांक २ यांचे वतीने विमा सप्ताहा निमित्ताने चित्रकला स्पर्धा संपन्न
केळघर प्रतिनिधी: जिल्हा परिषद शाळा मेढा येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ सातारा शाखा क्रमांक २ यांचे वतीने विमा सप्ताहा निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा मेढा येथे आयोजित करण्यासाठी जीवनमित्र फाऊंडेशन मेढा या सेवाभावी संस्थेने सहकार्य केले.
शाळेतील मुलांनी अतिशय सुंदर चित्र काढली होती.चित्रांतून मुलांनी पर्यावरण वाचवा,स्वछता अभियान या विषयी संदेश देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी एलआयसी चे वरीष्ठ शाखा अधिकारी मिलिंद ओक,उपशाखा अधिकारी गणेश घाडगे, मुख्याध्यापिका सौ.रंजना सपकाळ, एलआयसी चे विकास अधिकारी सोमनाथ काशीळकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक तोडकर,सदस्य सचिन करंजेकर,विमा प्रतिनिधी सुहास पाटील,शिक्षक सुधाकर दुंदळे ,विनायक करंजेकर योगिता ,मापारी ,कला शिक्षक पियुष गायकवाड व शिक्षक वर्ग उपस्थित होते.या स्पर्धेत लहान गटात शरयु कदम,स्वरा जवळ , विकास भुईया ,ईश्वरी तोडकर, यांनी तर मोठ्या गटात सान्वी हिरवे, ईश्वरी शिंदे, जान्हवी जाधव ,राजवी रोकडे या विद्यार्थांनी यश मिळवले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना प्रदूषण व स्वच्छताचे महत्व कळावे तसेच त्यांचा मोबाईल मधील वेळ कमी व्हावा म्हणुन ही स्पर्धा आयोजित केली होती असे प्रतिपादन वरीष्ठ शाखाअधिकारी मिलिंद ओक यांनी केले. जिल्हा परिषद शाळा मेढा येथे चित्रकला स्पर्धा घेवून एक चांगला उपक्रम राबविल्या बद्दल मुख्याध्यापक रंजना सपकाळ यांनी आयुर्विमा महामंडळाचे आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विमा प्रतिनिधी सुहास पाटील, कला शिक्षक पियुष गायकवाड यांनी प्रयत्न केले.
जीवन मित्र फाऊंडेशन मेढा यांचे वतीने असे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात या बद्दल सुधाकर दुंदळे यांनी फाऊंडेशनला धन्यवाद दिले. सोमनाथ काशीळकर यांनी प्रास्ताविक केले.विनायक करंजेकर यांनी आभार मानले.
