मौजे अतिट शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
शिरवळ प्रतिनिधी (संदेश चव्हाण)- खंडाळा तालुक्यातील अतिट येते छत्रपती शिवाजी बाल तरुण मंडळातील सर्व शिव भक्तांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिव ज्योत ही किल्ले पुरंदर ते अतिट या गावापर्यंत मंडळातील सर्व शिव भक्तांनी ही शिव ज्योत आणली.तसेच राज्याभिषेक सोहळा देखील सुंदर पद्धतीने पार पडला.राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात राजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली..
मिरवणुकीमध्ये गावातील सर्व ग्रामस्थ महिलावर्ग तसेच गावातील सर्व मंडळातील शिव भक्त आणि भगिनी वर्ग तसेच लहान चिमुकली मुले मुली वेगवेगळी वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणूक झाल्यानंतर अतिट गावच्या आदर्श सरपंच सौ.रुपाली अंकुश जाधव.. व सर्व मंडळातील सभासदांनी चांगल्या पद्धतीने भोजनाचे नियोजन केले.कार्यक्रमासाठी आकर्षक असे फेटे भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.संभाजी दादा जाधव पाटील यांच्याकडून देण्यात आले.भारूड व कलाकारांचा विशेष खर्च पुणेकर सहकारी यांनी केला.लोणंद विभागातून मलवडी या गावातून भारुड तसेच भारुडातील सर्व कलाकारांनी चांगल्या पद्धतीचे काम केले.. दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना मुलीच्या लग्नाबाबतच्या अपेक्षा मुलांना वेगवेगळ्या स्वरूपात भेडसावत आहे. हे पटवून देण्याचे काम या भारुडाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला. शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरी करण्यात आली.
