Post Views: 110
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेपाटील मराठा समाजाच्या हजारो बांधवांना घेऊन मुंबईत मोर्चा
सातारा -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील मराठा समाजाच्या हजारो बांधवांना घेऊन ते येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चासह धडकणार आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळातच मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू असणार असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे.
मनोज जरांगे यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. दोन दिवसांच्या प्रवासानंतर ते 29 ऑगस्ट रोजी रात्री मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचतील. त्यांच्या या प्रवासात हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
