Post Views: 37
मानसी घोष बनली ‘इंडियन आयडल १५’ ची विनर
मानसी घोष ‘इंडियन आयडल सीझन १५’ ची विजेती ठरली आहे. जिंकल्यावर तिला ट्रॉफीसोबत एक चमकदार कार आणि लाखो रुपयांची रोख रक्कम देखील मिळाली आहे. वयाच्या २४ वर्षात मानसीने ही कामगिरी केली आहे.मानसी घोषने ‘इंडियन आयडल सीझन १५’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली आहे.
या शोचा अंतिम सामना रविवार ६ एप्रिल रोजी झाला. स्पर्धकांनी त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स दिला. इंडियन आयडॉलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरही मानसीच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे. आता या बातमीने तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. मानसीने वयाच्या २४ व्या वर्षी ही कामगिरी करून दाखवली आहे तिच्या आवाजाने चाहत्यांना प्रेमात पाडले आहे.
